परांजपे प्रकल्पातील ग्राहकांसाठी खुशखबर

विरारच्या परांजपे  प्रकल्पातील आठशे ग्राहकांना प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर  परतावा मिळणार

संबंधित ग्राहकांनी ग्राहक भवनात  दु. २ ते सायं ४.३० या वेळात कागदपत्र पडताळणीसाठी संपर्क साधावा.

करोना निर्बंधांमुळे धनादेश वितरण टप्प्याटप्प्यात होणार

विरार-कोफराड येथे माफक दरात घरे उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवून १९८६-८७च्या सुमारास जयंत परांजपे यांनी हजारो मध्यमवर्गीय ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करुन फार मोठी फसवणूक केली होती. 

मुंबई ग्राहक पंचायतीने अशा ग्राहकांना संघटित करुन ग्राहक न्यायालयांत परांजपे यांच्याविरुद्ध पाच वेगवेगळ्या गटांत १९९८ ते २००२ या काळात दावे दाखल केले. सर्व दाव्यांचे निकाल आपल्या बाजूने लागले.

मात्र दिलेल्या रकमा परत मिळवून देण्याच्या मार्गात कायदेशीर आणि व्यावहारिक अशा अनेक अडचणी येत राहिल्या. या सर्व अडचणींवर मुंबई ग्राहक पंचायतीने अखेर यशस्वी मात केली असून या आठशे घर-खरेदीदारांना त्यांच्या रकमांचे धनादेश आता लवकरच मिळणार आहेत. 

सध्याच्या करोना साथीमुळे अस्तित्त्वात असलेले निर्बंध लक्षात घेता सर्व संबंधित ग्राहकांना हे धनादेश लगेच सरसकट वितरीत करणे शक्य नाही. त्यामुळे सुरवातीला तक्रार क्र. ४१२/१९९८ ते ७००/१९९८ मधील २७४ तक्रारदार  आणि दिल्ली येथे दाखल केलेल्या तक्रार क्र. ४१०/२००२ या तक्रारींतील २५९ तक्रारदार अशा एकुण  ५३६ ग्राहकांना डिसेंबर/जानेवारी मधे धनादेश वितरणाचे काम बांद्रे येथील उपनगर जिल्हा ग्राहक आयोगाच्या सहकार्याने आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या दोन‌ गटांतील हयात तक्रारदारांना प्राधान्याने धनादेश वितरण करण्यात येणार असून जे तक्रारदार हयात नसतील त्यांच्या बाबतीत पुढील महिन्यात सविस्तर माहिती दिली जाईल.

या कामासाठी ग्राहक भवन येथे परांजपे ग्राहक -  परतावा कक्ष" १८ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार दु. २ ते सायं. ४.३० पर्यंत कार्यरत असेल.  

या कक्षात वर उल्लेखलेल्या दोन गटांतील ग्राहकांची ओळखपत्रे/कागदपत्रे पडताळून धनादेश देण्यायोग्य ग्राहकांची यादी वांद्रे येथील जिल्हा ग्राहक आयोगाकडे पाठवण्यात येईल आणि तेथून धनादेश घेण्यासाठीची तारीख आणि वेळही ग्राहक भवन येथील कार्यकर्ते कागद पडताळणीच्या वेळी सांगण्यात येईल.  

मुंबई ग्राहक पंचायतीने या सर्व तक्रारींसाठी संबंधित ग्राहकांना अत्यंत नाममात्र फी आकारली होती. या सर्व केसेस मधे सर्व निर्णय आपल्या बाजूने आल्यावरही जयंत परांजपे यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे पुन्हा एकदा ग्राहक न्यायालयांत रक्कम वसुलीसाठी अर्ज दाखल करावे लागले. वसुली दाखले प्राप्त करुन ठाणे/ पालघर जिल्हाधिकारी आणि वसई तहसिलदार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन परांजपे यांच्या मालमत्तेचा आपण लिलाव करुन घेतला. परांजपे यांनी त्या लिलावाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. आपण तिथेही परांजपे यांची याचिका फेटाळून घेण्यात यशस्वी झालो. परंतु या सर्व प्रकरणात होत असलेला कालापव्यय लक्षात घेऊन वर उल्लेखलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रियेसाठी संस्थेने या सर्व तक्रारदारांना एक पैसाही फी आकारली नाही.  आता या सर्व तक्रारदारांना प्रदीर्घ लढ्यानंतर त्यांचे पैसे सव्याज परत मिळणार आहेत हे लक्षात घेऊन या सर्व तक्रारदार ग्राहकांनी संस्थेला किमान १ टक्का रक्कम देणगी पोटी देणे उचित ठरेल. त्यासाठी ग्राहक भवन येथे येताना रक्कम न घालता एक कोरा धनादेश मुंबई ग्राहक पंचायतीच्या नावे न‌ विसरता घेऊन यावा ही नम्र विनंती. ग्राहक भवनमधील यादीनुसार आपल्याला मिळणारी एकूण रक्कम बघून त्यानुसार round figure आपण  धनादेशावर लिहून तो धनादेश कार्यकर्त्यांकडे स्वाधीन करावा.

तसेच आधार कार्ड, पॅन‌ कार्डच्या copiesसह  परांजपे यांना भरलेल्या रकमांच्या पावत्या अशी कागदपत्रेही पडताळणीसाठी घेऊन यावी. 

परांजपे परतावा प्रकरणी अधिक चौकशी फक्त 8828311109 या मोबाईल क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत करता येईल.

उर्वरित तीन गटांतील ग्राहकांचे धनादेश हे जानेवारी/फेब्रुवारी २०२१ मधे वितरीत करण्याची योजना आपण निश्र्चित करत आहोत. तरी या तीन गटांतील तक्रारदारांना पुढील सुचनेपर्यंत धीर धरण्याची नम्र विनंती.

परतावा देण्यात येणाऱ्या दोन‌ गटांतील ग्राहकांची यादी खाली PDF स्वरूपात दिलेली आहे. 

 

शिरीष देशपांडे
कार्याध्यक्ष
१६.१२.२०२०

 

परतावा मिळणाऱ्या ग्राहकांची यादी

History

Mumbai Grahak Panchayat has been engaged in activities of consumer protection and education for the last 33 years.

Read more

Vision

Our vision is to organize consumers for common cause and fight against injustice to protect their interest.

Read more

Mission

“Grahak Hitay, Grahak Sukhay” (In the interest of consumers, for the happiness of consumers)

Read more

Our Activities

oganization

Monthly distribution of grocery on no profit, no loss basis

Distribution Centers: Mumbai, Thane, Palghar, Pen, Vasai and Pune. Average number of Goods approximately 92. Monthly distribution: (Approximate total during the year- 450 items) Mark-up on purchases around 8.5%. Total number of groups participating in distribution: 2,500.

Read more
oganization

Panchayat Peth (Consumer Plaza)

An innovative and unique activity to supply different types of quality goods to the society in general at reasonable prices at different locations, generally before Diwali. It also offers a platform to entrepreneurs for marketing their products. Turnover during 2018-19 was more than Rs.10 crores.

Read more

Our Events

  • 8 Jun 2020

Cyber Security in Online Transactions

4.30 PM ZOOM WEBINAR

Joining link: https://m.teamlink.co/6032400014

  • 11 Jun 2020

Webinar 6 - Awareness about Medicines

4.30 PM ZOOM WEBINAR

Registration link: https://us02web.zoom.us/meeting/register/tZcuduqtrz4pEtTZ99wsscM4v8s3NOfeEfSN

  • 02/06/2020

Consumer And Consumer Movement Post-Corona

4.30 PM - 6.00 PM ZOOM WEBINAR

Registration Link: https://us02web.zoom.us/meeting/register/tZwkfuyqpjwjH9RQ6JJ3PsmgIjspnziIOpDy

Why People Choose Us

Loyal customer base of over 32,000 families

Mumbai Grahak Panchayat has gained trust of 32,000+ families and also have made 120,000 consumers happy.

Sensitive consumerism

Charityfaith is a nonprofit organization for poor student. It's also provide food and scholarship

Quick to battle

While most Indians sit and mourn their helplessness MGP has proved you can thrive without government help; in fact, you can take on the government and still thrive.

MEET OUR BOARD OF TRUSTEES

Mr.

Corporation - Manager

Our Success Rate

In 30+ years, Mumbai Grahak Panchayat has become a powerful advocate of consumer issues.

0

Happy Families

0

Successful Missions

0

Volunteer Reached

0

Globalization Work

Success Stories

MGP Vs. M/s Lohia Machines Ltd.

Lakhs of consumers paid security deposits to the scooter company for booking scooters. Delivery was promised within a certain period but the demand could not be coped with.

Read more

MGP Vs. Airlines

Supreme Court orders full refund for airline passengers for flights cancelled during Corona Pandemic. Airlines to endeavor to refund the collected money to passengers within 15 days from today. If on account of Financial Distress any airline not able refund money now,  it shall provide Credit  Shell equal to the amount of fare collected, in the name of the passenger so as to consume the same on or before 31st March 2021. This Credit Shell is transferable to other passengers and also re-routable without any extra charges. The Credit Shell value shall be enhanced by 0.75% per month till 31st March 2021. If passengers do not use Credit Shell by 31st March, Airlines will have to give refund with interest @ 0.75 % per month (9  % p.a.). As you may be  aware Mumbai Grahak Panchayat (MGP) was Intervenor in this PIL filed by Pravasi Legal Cell. The reliefs are also in line with UNCTAD Advisory issued as a result of follow-up by MGP.

Read more

MGP Vs. Reliance Energy

Reliance Energy had slapped notices on its consumers in Mumbai demanding they pay an additional security deposit equal to three months' bills and threatened to disconnect their power supply if the order was unheeded.

Read more

Please take part in our initiatives

Changing lives to make easier for consumers!